पाच महिन्यापासून निराधारांचे मानधन थकल्याने लाभार्थी अडचणीत
गेल्या पाच महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ, संजयगांधी योजनेचे निराधार पेन्शन थकीत आहे. तसेच घाटंजी तालुक्यातील अपंग, विधवा यांना मिळणारे निराधारचे पैसे हे सुद्धा थकीत आहे. ते तात्काळ मिळण्यात यावे यासाठी साथी निराधार संघटनेचे मुख्य संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्याला निवेदन तहसीलदार घाटंजी यांच्या मार्फत देण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांना थकत्या वयात मजुरीला जाऊन पोट भरणे शक्य नाही. कारण शरीरात प्राण नाही. पैसे कमवीत नाही म्हणून घरातही मान नाही. वृद्धापणामुळे अनेक आजार जोडलेले असतात. सध्या ब्लडप्रेशर, शुगरच्या गोळ्या सुद्धा घेण्यासाठी यांच्या जवळ पैसे नाही. यामुळे हाल होत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली