छगन भुजबाळांची मंत्रीमंडळात वार्णी, चंदनझीऱ्यात जल्लोष
छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने चंदनझीरा येथे माळी महासंघाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू भरवत जल्लोष साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने जालनासह महाराष्ट्रभरात त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. जालना शहरातील चंदनझीरा येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकामध्ये माळी महासंघाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत आनंद उत्सव साजरा केला.
माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष रासवे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरपीआयचे युवा जिल्हाअध्यक्ष विजय खरात, शहराध्यक्ष अनिल खिल्लारे, सिराज पटेल, अमोल पालवे, रितेश पंचारिया,सचिन साळवे, पुंजाराम खरात, गणेश इंचे, सुनील आदमाने, सुनिल तरासे, प्रदीप रासवे, अनिल तरासे, मुंजा गोरे, गणेश म्हस्के, गणेश गिरी, अहेमद पटेल, यांच्यासह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली