ON नांदेड दौरा - आता खूप कमी कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या पंचायत राज मधल्या आरक्षणासंदर्भात माननीय न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, त्याचबरोबर ओबीसी बांधवांचे जे मूळ ओबीसी आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक अन्याय झालेला आहे, त्या लोकांना एकत्रित करणे त्या लोकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व कसं भेटेल? त्या लोकांना जास्तीत जास्त निर्णय प्रक्रियेमध्ये कसं जाता येईल? या दृष्टिकोनातून त्यांच्यात अवेअरनेस निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण व्हावा, या दृष्टिकोनातून आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक लॉंग मार्च काढणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आमच्या ओबीसीच्या माजी नगरसेवक, माजी झेडपी सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, अनेक नेते यांच्या गाठीभेटी घेण्याचा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्या संदर्भात मी नांदेडला आलो आहे.
ON चंद्रशेखर बावनकुळे - अनुसूचित जातीच्या वर्गीकरणासाठी बैठक घेणार - बावनकुळे यांना हात जोडून विनंती आहे, याच्यावरती तज्ञ लोकांची एक समिती गठन करावी आणि तज्ञ लोकांचा याच्यावरती चर्चा, विचार व्हावा आणि मग अशा पद्धतीच्या वर्गीकरणाबाबत तुम्ही पुढे जावं
ON मनोज जरांगे पाटील - मनोज जरांगे अजित पवारांना म्हणतात की, याची किंमत मोजावी लागेल. किंमत त्यांनी विधानसभेला मोजली आहे. जरांगे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आणि देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही रात्रंदिवस शिव्या देत होते, ते वाजत गाजत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे किंमत मोजायचा प्रश्न उरतो कुठे? तुम्हीच किंमत मोजा की, आपल्या भूमिकेमुळे नक्की काय झालं? महाराष्ट्रमध्ये तुमच्या आव्हानाला विधानसभेला का प्रतिसाद मिळाला नाही. या गोष्टीचे आत्मचिंतन जरांगेंनी कधीतरी, कुठेतरी केव्हा करावं कुणाचा तरी सल्ला मानावा, ऐकावं, लोकशाही, लोकनियुक्त आमदार, लोकनियुक्त मंत्री, लोक नियुक्त मुख्यमंत्री यांच्यावर बोलणं, पांचट जोक करणं बंद करावे आणि मराठा समाजावर असे काय वाईट वेळ आली आहे हो की पांचट जोक मारणाऱ्या शिव्या देणाऱ्या माणसाचं नेतृत्व तुम्हाला करावं लागतयं. कुठे वसंत दादा पाटील, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, कुठे जयंत पाटील, कुठे विखे पाटील, कुठे जयंत पाटील, काय नेता तुम्ही निवडला आहे. जो पांचट जोक मारतो, जो शिवराळ भाषेत बोलता, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर छगन भुजबळांसारख्या माणसाला अश्लील भाषेमध्ये बोलतो. त्याचवेळी आमच्या माता भगिनी टीव्ही समोर टीव्ही बघत असताना, ज्यांची मान खाली जाते अशा भाषेत बोलतात. तुम्ही ज्या माणसामुळे मराठा बांधवांचे नुकसान होत आहे, आज EWS 8.7% दहा टक्के पैकी मराठा बांधवांचा फायदा झाला होता आता त्याचं मराठा बांधवांचं किती नुकसान झालं? जरांगेंनी या गोष्टीचा आत्मचिंतन करावं
ON स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक - ओबीसींची भूमिका मूळ ओबीसींना जो सामाजिक दृष्ट्या या गाव - गाड्यांमधील जो मूळ ओबीसी आहे, त्या मूळ ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्काच्या आड जर धर्म - दांडगी येत असतील तर ओबीसींना एकजुटीशिवाय त्यांच्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नाही, जर ओबीसीमध्ये जर बोगस कुणब्यांनी एन्ट्री करून निवडणुकीला उभे राहिले तर मूळ ओबीसीचं नुकसान होईल त्यासाठी आम्ही लॉन्ग मार्च काढत आहोत