'ऑपरेशन सिंदूर' मुळे भारताची ताकद जगासमोर; बुलढाण्यात तिरंगा रॅलीद्वारे सैनिकांच्या शौर्याला सलाम
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या यशस्वी कारवाईने भारताची सैनिकी ताकद आणि जागतिक स्तरावरील भूमिका अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरात सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन होत आहे. अशाच भावनांनी भारलेल्या वातावरणात, बुलढाणा शहरात आज सर्वपक्षीय तिरंगा रॅली काढण्यात आली.
ही रॅली भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून निघालेली रॅली संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक, चिखली रोड आणि सर्क्युलर रोड मार्गे शहीद जवान स्मारकापर्यंत नेण्यात आली. येथे शहीद जवानांना सामूहिक अभिवादन करण्यात आले. सैनिकांच्या मनोबलासाठी, त्यांच्या पराक्रमाचे कौतुक करण्यासाठी आणि देशप्रेम जागवण्यासाठी ही तिरंगा रॅली प्रेरणादायी ठरली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली