भंडारा जिल्ह्यातील एक कमकासुर गावात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल गावाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून येथील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र या पुनर्वसन झालेल्या गावात केवळ एकच विहीर असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनाना तारेवरची कसरत कराव लागत आहे.
बावनथडी धरण क्षेत्रात येणाऱ्या कमकासुर व सुसूरडोह या गावांचे पुनर्वसन रामपूर व बघेडा येथे करण्यात आले. रामपूर पुनर्वसन गावात केवळ एकच विहीर असून ३५० नागरिकांची ती तहान भागवीत आहे. येथे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे येथील आदिवासी बांधव मजुरी सोडून पिण्याचे पाणी मिळावे याकरिता गावातील विहिरीवर दिसून येतात. राज्य शासनाने येथील ग्रामस्थांकरिता १० कोटींच्या पॅकेज पुनर्वसन व्हावे याकरिता घोषित केला होता परंतु त्यापैकी केवळ ३.५० कोटी रुपये आतापर्यंत येथील नागरिकांना मिळाला आहे.
कमकासुरचे पुनर्वसन रामपूर येथे झाले तेथे केवळ एकच विहीर उपलब्ध करून देण्यात आली. हे गाव शंभर आदिवासी बहुल आहे. येथील नागरिक हे बहुतांश मजुरी करतात. कुटुंबाला पाणी मिळावे याकरिता ते मजुरीवर जात नसल्याची माहिती आहे. केवळ पाण्याकरिता मजुरीवर पाणी फेरावे लागते. पाण्यासारखी मूलभूत समस्या मागील पंधरा वर्षापासून येथे सुटलेली नाही.पुनर्वसन झालेल्या रामपूर हमेशा येथे अजूनपर्यंत ग्रामपंचायत अस्तित्वात आली नाही. ससुरडोह या गावाला हे गाव जोडण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांना सुसरडोह येथे तीन ते चार किलोमीटर अंतरावर विविध दाखल्यांकरिता जावे लागते. ग्रामपंचायत नसलेले राज्यातील हे पहिलेच गाव असावे.
राज्याचे आदिवासी मंत्री आज जिल्ह्यात आदिवासींच्या समस्या सोडवण्याकरिता बैठक घेत आहेत त्याच या आदिवासी कुटुंबांना न्याय मिळेल काय असा प्रश्न उपस्थित होतो. बावनथडी धरण क्षेत्रात तुमसर तालुक्यातील कमकासुर व सुसूरडोह ही गावे धरणात समाविष्ट झाली. त्यांचे पुनर्वसन राज्य शासनाने कमकासुरचे पुनर्वसन रामपूर (हमेशा) तर ससुरडोहचे पुनर्वसन बघेडा येथे केले. तब्बल १५ वर्षानंतरही या गावात मूलभूत समस्या अजून पर्यंत सुटल्या नाहीत अशा तक्रारी आहेत.