LOKSANDESH
NEWS
नऊ कोटीतुन धुळे रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट; प्रधानमंत्री मोंदीच्या हस्ते उद्या होणार ऑनलाईन लोकार्पण
धुळे येथील रेल्वे स्टेशनच्या विविध विकास कामांचे उद्या (22 मे ) रोजी लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती धुळे रेल्वे स्टेशन प्रबंधक सुरेश जाधव यांनी दिली.
जाधव यांनी सांगितले की, विकासकामे अमृत बारा स्टेशन योजनेतर्गंत झालेल्या विकास कामांचे लोकार्पण 22 मे रोजी सकाळी दहाच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आजी माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्यासह निमंत्रित मान्यवर उपस्थित राहतील अशी माहिती जाधव यांनी दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली