डोंबिवली एमआयडीसी परिसरात पावसाच्या तोंडावर नाल्यांची कामे अर्धवट, परिसरात दुर्गंधी नागरिकांचा संताप
डोंबिवली एमआयडीसी मिलाप नगर निवासी भागात एमआयडीसी कडून नाले दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र पावसाळा तोंडावर आलेला असताना ही कामे अद्यापही संथ गतीने सुरू आहेत तर काही कामे रखडल्याचे दिसून येतेय. या नाल्यांच्या कामासाठी काही ठिकाणी पाणी अडवल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मिलाप नगर परिसरात पावसाळयात अनेक ठिकणी पाणी साचते.
त्यामुळे या नाल्यांची कामे पावसाळ्या आधी पूर्ण न झाल्यास अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. अनेक ठिकाणी ही नाल्यांचे कामे अद्यापही रखडलेली आहेत तर काही ठिकाणी ही कामे निकृष्ट दर्जाचे झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पावसाळ्यात या अर्धवट नाल्यांमुळे पाणी तुंबल्यास नागरिकांचे हाल होण्याची शक्यता वर्तवत पावसाळ्यापूर्वी नाल्यांची कामे पूर्ण करावीत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.