स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोल्हापुरात महाविकास आघाडी एकत्र लढणार - आमदार सतेज पाटील
ON गिरीश महाजन वक्तव्य (निवडणूका लांबणीवर)
- सुप्रीम कोर्टात ओबीसी संदर्भात निर्णय झाला आहे
- शिवाय काही कारणास्तव निवडणूकांसाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात संकेत दिला आहे
- महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती सर्वजणांना माहिती आहे
- त्यामुळे एकावेळी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका निवडणूक आयोग घेवू शकतो का? याबाबत साक्षंकता आहे
- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शासनाची याबाबतीत काय भूमिका असणार आहे, हे स्पष्ट करावं
- शासनाने सर्व पक्षांना बोलावून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांविषयी चर्चा करावी
- सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने, आता शासनाला कुठल्याही कारणास्तव निवडणूका पुढे ढकलणं शक्य होणार नाही
- सत्ता आल्यापासून महायुतीचा कारभार वाईट सुरू आहे. त्यामुळे जनमत मिळेल का नाही? याची महायुतीला शंका आहे
- मात्र सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार महायुतीला निवडणूका घ्याव्याच लागतील
ON दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
- शरद पवार साहेब इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आहेत
- इंडिया आघाडीच्या स्थापनेवेळी प्रमुख वाटा शरद पवारांचा राहिलेला आहे
- त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील यामध्ये तथ्य वाटत नाही
- शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीच चिन्ह जाण्यापर्यंतचा लढा सुप्रीम कोर्टात दिलेला आहे
- राज्यात महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी आतापर्यंत एकत्रीत काम केलं आहे. आणि यापुढेही यामध्ये कुठलीही अडचण येईल, असं वाटत नाही
- कार्यक्रमात आम्ही सर्वजण एकत्र असतो
- सहकाराचा कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रम याचा संबंध जोडणं संयुक्तिक राहणार नाही
ON विजय वड्डेटीवार वक्तव्य (भारत -पाक युद्ध)
- भारत - पाकिस्तान युध्द जन्य परिस्थितीवर चर्चा होणं आवश्यक आहे
- याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सांगितले आहे
- केंद्र सरकारची भूमिका संसदेच्या माध्यमातून देशासमोर आली पाहिजे
- कारण सीजफायरची घोषणा दुर्दैवाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केली
- सीजफायरची घोषणा भारताच्या पंतप्रधानांनी जाहीर करणं अपेक्षित होतं
- काँग्रेस पक्षाने पहिल्यापासून पाकिस्तानवर कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारच्या पाठीशी असल्याच स्पष्ट केलं आहे
- त्यामुळे याची चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे
ON अलमट्टी उंची विरोध
- अलमट्टी धरणाची उंची वाढल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांना मोठा फटका बसणार आहे
- लवादाने जरी निर्णय दिला असला तरी, अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढू नये
- शिवाय महाराष्ट्र सरकारने याबाबतीत कडक भूमिका घ्यावी
- तेलंगणा सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आहे, त्याठिकाणी पार्टी होवून हे हाणून पाडण्याच काम करावं
- अलमट्टीच्या उंची विरोधात १८ तारखेला चक्काजाम आंदोलन सर्वपक्षीय आहे
- महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घ्यावी
- लाडक्या बहिणीच 2100 रुपये कुठे गेले याचं सरकारने उत्तर द्याव
- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोल्हापुरात शक्य होईल, तिथे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.