LOKSANDESH NEWS
बुलढाण्यातील मिर्झा नगर मधील पाच घरे जळून खाक; तीन अग्निशमन दलाने आग आणली आटोक्यात
बुलढाणा शहरातील मिर्झा नगर भागात डोंगराला लागून असलेल्या वस्तीत मध्यरात्रीनंतर आग लागली. आग एवढी भीषण होती की आगीने वस्तीतील पाच घरांना खाक केले आहे. एका ठिकाणाहून लागलेली ही आग हळूहळू इतर घरापर्यंत पोहोचली होती. दोन ते अडीच वाजेच्या सुमारास ही लागली होती. आगीचे रुद्र रूप पाहता चिखली वरून सुद्धा अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले होते.
बुलढाणा नगरपालिकेचे दोन अग्निशमन वाहन आणि चिखलीचे एक अशा तीन वाहनांनी तब्बल अडीच ते तीन तासापर्यंत शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही परंतु घरेच्या घरे खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.