LOKSANDESH NEWS
पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई उपनगरातील रस्ते कामाची केली पाहणी
पालकमंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबई उपनगरातील रस्ते कामाची पाहाणी केली. यावेळी घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, छेडानगर मधील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहाणी केली. यावेळी अनेक रस्ते अर्धवट स्वरूपात असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना याचा जाब विचारला व या कामांचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत, त्याचबरोबर रस्त्यांच्या काम असो की नाल्यांच्या बाबतीत मी असमाधानी असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
- मुंबईतील पश्चिम उपनगराचा दौरा आम्ही केला. आता पूर्व उपनगराच्या रस्त्यांच्या कामाचा दौरा करत आहोत. त्याआधी नालेसफाई मुंबई पश्चिम उपनगर मुंबई शहर त्याची पाहणी केली, दौरा केला, कामाचा पाठपुरावा केला
- रस्त्याच्या बाबतीत आणि विशेषतः सिमेंट काँक्रीट याच्याबाबत कामाची संख्या दरवर्षीपेक्षा मुद्दा म्हणून सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे यांच्या सरकार पेक्षा पाच पटीने जास्त आहे. पण घेतलेले काम पाचपटीने जास्त आहेत ती वेळेत पूर्ण होण्यासाठी गती अजून वाढवावी लागेल. त्यामुळे समाधानकारक नाही अन्य सुविधा दूर केल्या पाहिजेत वेळेत काम पूर्ण व्हावं याचा आम्ही पाठपुरावा करत राहू
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली