क्रिकेटच्या मैदानात उतरले गृहराज्यमंत्री योगेश कदम
गृहराज्यमंत्री योगेश कदम दापोली दौऱ्यावर असताना त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. तरुणांसोबत थेट मैदानात उतरून त्यांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. यामुळे उपस्थित तरुण खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि परिसरात राज्यमंत्र्याची बॅटिंग बघण्यासाठी गर्दी जमली होती. क्रिकेट हा माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा खेळ आहे.
आज माटवणच्या मैदानात बॅट हातात घेताना कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या. आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ मिळत नाही, पण अजूनही मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतो असेही ते म्हणाले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली