बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात पुण्यात रंगली धम्म पहाट
- देशभरात आजबुद्ध पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय. या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झकास होता. जयंती चा जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजेच बुध्द पौर्णिमेचं औचित्य साधतं विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, यांच्या वतीने पुण्यत धम्म पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज पहाटे 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन येथे बुद्ध - धम्म गीतांची मंगलमय पहाट रंगला. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाने या मंगलमय पहाटेला सुरुवात झाली.
या कार्यक्रमात सा.रे.ग.म. फेम कुणाल वराळे, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुष्का शिकतोडे, सा.रे.ग.म. फेम स्वप्नजा इंगोले, पार्श्वगायक संविधान खरात, स्वप्निल जाधव यांनी बुद्ध - धम्म, भीम गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अनुयायांनी गौतम बुद्ध यांना अनुवादन करत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.