शक्ती प्रदर्शन करत नांदेड येथे काँग्रेस पक्षाची जय जवान जय किसान तिरंगा महा रॅली संपन्न
आज नांदेड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत तिरंगा महा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली शहरातील नवा मोढा येथील काँग्रेस कार्यालय येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मार्गदर्शन होवून कार्यालयापासुन ते महात्मा फुले पुतळा, शिवाजी नगर, कला मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या रॅलीत चार ते पाच हजार कार्येकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा डॉ शिवाजीराव काळगे, खा रविंद्र चंव्हाण, माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरेकर, माजी आमदार माधवराव जवळगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.