पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा धावत असताना झाला मृत्यू
मा.पंकज लक्ष्मणराव घावटधुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या 42 वर्षीय पंकज लक्ष्मणराव घावट यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंकज घावट हे अमरावती जिल्ह्यातील सावळापूर जवळील आसेगाव पूर्णा येथील रहिवासी असून ते माजी सैनिक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांचे प्रशिक्षण सुरू असताना ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पंकज घावट यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे.
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे समादेशक विजय पवार यांनी सांगितले की पंकज घावट हे रोज नियमित प्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्रात सराव करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले ही बाब त्यांच्या काही जवळच्या मित्रांना कळतात त्यांनी तात्काळ त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात आणले मात्र यावेळी या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. पंकज घावट हे सध्या धुळे पीटीसी मध्ये प्रशिक्षण घेत होते. मात्र, प्रशिक्षण पुर्ण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण जरी कळलेले नसले तरी मात्र, हा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.