दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची कोणतीही अजून चर्चा झाली नाहीये - अनिल देशमुख
ऑन पवार एकत्र
- दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची चर्चा केवळ माध्यमात आहेत,आमच्या स्तरावर काही चर्चा नाही
- संजय राऊत यांच्या म्हणण्यात सत्यता नाही, त्यांच्याकडे जी माहिती असेल त्यावर ते बोलले असतील
- प्रत्येक जण आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमच्यासोबत आहेत
- चर्चाच नाही तर खोडा टाकण्याच्या विषय नाही
- संजय राऊत यांच्याकडे काही माहिती असेल त्यावर ते बोलले असतील
- शरद पवार यांच्याशी कालच माझी भेट झाली, त्यात यावर काही चर्चा नाही
ऑन स्थानिक स्वराज्य निवडणूक
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोणताही पक्ष स्थानिक राजकारण आणि राजकीय स्थितीवर निर्णय घेतो
- एखाद्या जिल्ह्यात कशी राजकीय स्थिती आहे त्यावर युती होऊ शकते, काही ठिकाणी युती होऊ शकत नाही
- चाचपणी सुरू आहे, मनपा, नगरपालिका महाविकास आघाडी सोबत लढायची का यावर प्रत्येक जिल्ह्यत चाचपनी सुरू आहे
- काय म्हणाले ते मला माहिती नाही, मी ऐकले नाही
- पक्षाचे नागपुरातील जे मोठे नेते आहेत त्यांच्याशी बैठक घेऊन निवडणुकीबाबत निर्णय घेऊ
ऑन अवकाळी नुकसान
- मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नरखेड, काटोल भागात संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. मृग बहारचे मोठे नुकसान झाले आहे
- ndrf किंवा sdrf च्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकर मदत द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहे, लवकर मदत घ्यावी
ऑन लाडकी बहीण
- शासकीय महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर योग्य नाही
ऑन महिला आयोग
- महिला आयोग महत्वाचे आहे, आता केवळ चाकणकर अध्यक्ष आहेत त्यांच्या हाता खाली त्यांचे सदस्य नाहीयेत, राज्य सरकारने लवकर सदस्यांची नियुक्ती करावी, जिल्हास्तरावर नियुक्ती करावी
- राजकीय व्यक्तीची निवड महिला आयोगावर करू नये अशी मागणी होत असते, मात्र तो सरकारचा निर्णय असतो