मंत्री संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद
ON निवडणूक महानगरपालिका युती
- गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकत्र आल्यामुळे यश मिळाले, निवडणुकीत जराही बेबनाव दिसल्यास जनता विचार करतात. महायुती म्हणून लढावे म्हणून जनता कल असतो, त्यामुळे महायुती म्हणून लढावे असे आम्हाला वाटते. सर्व बाबी महायुती नेते गंभीरपणे घेत आहे. सर्व ठिकाणी आम्ही महायुती म्हणून लढणार हे नक्की आहे.
ON संभाजीनगर दरोडा
- ज्याच्या घरावर दरोडा पडला त्यांना मी बोलवले आहे. अनेकदा आपण घेतलेल्या काही वस्तूची पावती नसते, त्याचा खुलासा लड्डा देखील करणार आहे. अनेक लोकांनी सांगितले जास्त सोन असण्याची शक्यता आहे. तपासात सोनं किती आहे, हे स्पष्ट होईल.
ON दानवे संभाजीनगर दरोडा वक्तव्य
- असा पोलिसांवर आरोप करणे चुकीचे आहे, ज्यावेळी एन्काऊंटर झालं, त्यावेळी गाडीत आणखी एक जण होता. पोलिसांना एन्काऊंटर करायचं असल्यास दोघांचा केला असता. सोबत असणारी मैत्रीण सी.आय.डी. च्या ताब्यात आहे. आणि तपास सुरू आहे.
ON लाडकी बहीण
- लाडकी बहीण चालवयाची असल्यास अत्यावश्यक पैसे लागणार असून सरकारला लाडकी बहीण चालवायची आहे.
ज्यांना काही सहारा नाही, कुणी मदत करत नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे. काही लोक चारचाकी असताना फायदा घेतात. जे झालं ते झालं आता कुणीही असे करू नका. कोणतेही वसुली केली जाणार नाही.
- एखादी गोष्ट घोषणा केल्यास पूर्ण करण्याचे काम सरकारचे आहे. काही आर्थिक ताण होतो आहे, पण ही योजना बंद होणार नाही.
ON सामाजिक न्याय विभाग निधी कपात
- माझी मुख्यमंत्री चर्चा झाली असून, आता यावर बोलणार नाही
ON गुलाबराव वक्तव्य (राजकरणी कर्ज बुडवता)
- गुलाबराव काय म्हणतात माहीत नाही, मी रेग्युलर हप्ते भरत असतो
ON कोकाटे
- असे वक्तव्य करून अंगावर घेऊ नका. असा सल्ला त्यांना दिला होता. पण त्याचा स्वभाव आहे, त्यांच्या अशा वक्तव्यामुळे सरकारची देखील बदनामी होते.
ON जयंत पाटील
- जयंत पाटील यांचे मन लागत नाही, ते खूप दिवस राहणार नाही. त्या पक्षात गोधळं माजला आहे. लवकर निर्णय न झाल्यास पक्ष फुटू शकतो.
ON संजय राऊत
- रोजचा भोगा लोकांना पचत नाही, आता जे काही बोलत आहे त्यांना वाटत आहे की, मी स्वतंत्र लढाई लढून आलो आहे. नरकातून स्वर्गात जाऊन त्यांना वाट सापडली असून, त्यावर कुणी जायला तयार नाही. असे केल्याने पुस्तक खप वाढणार नाही.
ON संजय राऊत (दोन पवार एकत्र येणार नाहीत)
- संजय राऊत डोक्यावर पडलेला माणूस आहे, त्यांच्या पक्षात काय चालले आहे कशाला वाकून पाहतो, उबाठा मध्ये काय सुरू आहे, ते पाहावे.
ON संजय राऊत सुप्रिया सुळे वक्तव्य
- सुप्रिया सुळे यांना असे बोलणे, कधी त्यांची तारफी करतो. आपलं गरज असल्यास लोटांग घालणार हा माणूस, उबाठा वाटोळं याच्या तोंडामुळे झाला आहे.
ON आदित्य ठाकरे BMC मोर्चा
- त्यांच्या लोकांना काम मिळत नसल्याने मोर्चा काढत आहेत. टक्केवारी साठी काढत आहे. आमच्या ठेकेदार यांचं काय यासाठी मोर्चा काढत आहे.
ON महादेव जानकर
- आपण कोणत्या पक्षात जाणार हे जाणकार यांना माहीत नसते, पण अखेर ते महायुतीतच जाणार आहे. ते स्वतःच वाटोळ करून घेणार नाहीत.
ON दानवे विट्स हॉटेल वक्तव्य
- दलाली करण्यापेक्षा व्यवसाय करणे योग्य, यात मी काही चुकीचं केलं असल्यास राजकरणात संन्यास घेईल.
ON अंजली दमानिया
- ती विद्वान महिला आहे. त्यांना माहीत नाही माझ्या मुलांकडे त्या बंदुकीच लायसन्स आहे.
ON संजय राऊत
- संजय राऊतला माहीत नाही, त्याच्या राज्यसभेवर जाताना आम्ही एकत्र बसलो. कसे तुम्ही पाय पडत होते, उद्धव ठाकरे यांना शिव्या घालत होते. हे आम्हाला माहीत आहे. योग्यवेळी सांगू सर्व
ON धंनजय मुंडे
- अशी वादळी जेव्हा येतात, तेव्हा असं शांत असणे गरजेचे आहे. अशावेळी लोकसंधी साधून टोच मारतात.
ON संजय राऊत
- आम्ही बेटावर आहोत, आपली दुकान बुडत आहे, घर उडत आहे. संजय राऊतने बडबड बंद करावी आणि गप्प बसावे
ON अजित पवार पैसे कापतात, पडळकर वक्तव्य
- त्याचा वैयक्तिक प्रश्न असून देवेंद्र फडणवीस यांना भेटावं, ते नक्की दखल घेतील