दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक व्हावे - आमदार गोपीचंद पडळकर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक व्हावे - आमदार गोपीचंद पडळकर

                                                           LOKSANDESH  NEWS 





दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक व्हावे - आमदार गोपीचंद पडळकर

 दिल्लीमध्ये सध्याचे राष्ट्रपती भवन आणि रायसोनी गावाची जागा ही होळकरांची आहे. याच परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे. अशी मागणी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. तसेच प्रथमच धनगर वाड्यातून बाहेर येत, अहिल्यादेवींची देशभर जयंती साजरी होत आहे. याचे सारे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावे लागेल. असे तोंड भरून कौतुक भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. 

अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी येथे दीपोत्सव आयोजित केला आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, राष्ट्रपती मुख्यमंत्री ही या कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती पडळकर यांनी दिली. यावेळेस संघाने देशभर जयंती साजरी करत असताना, देशातील अनेक मुख्यमंत्र्यांना देखील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले असल्याचेही पडळकर यांनी सांगितले. 

दिल्लीमध्ये मराठा सरदारांनी मोठा दबदबा निर्माण केला. त्यामध्ये मल्हारराव होळकरांचे नाव ऐकल्यावर दिल्ली थरथर कापत होती. अशा दिल्लीत अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक व्हावे. तसेच देशभर कुठेही नसलेले मल्हारराव होळकर यांचेही स्मारक होण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे लेखी स्वरूपात मागणी करणार असल्याचेही पडळकर यांनी यावेळी सांगितले. 

या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजेंड्यावर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले. तसेच दिल्लीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे. यासाठी धनगर समाज पडळकर यांच्या माध्यमातून आग्रही झालेला दिसून येतो आहे. 



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.