वैष्णवी वरील आरोपानंतर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद
- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना काल न्यायालयाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली. कोर्टातील सुनावणीनंतर हगवणेंच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. त्यावर आज मृत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत हगवणे यांच्या दाव्यांची पोलखोल करत त्यांच्यावर परत एकदा गंभीर आरोप केले.
यावेळी बोलताना अनिल कस्पटेंना अश्रू अनावर झाले. माझी मुलगी तर आता परत येणार नाही, पण आपल्या मृत मुलीला न्याय द्या. असं ते रडताना बोलत होते. हगवणे यांच्याकडे पाच अलिशान गाड्या आहेत, त्यामुळे गाडीसाठी वैष्णवीचा छळ केला नाही. शिवाय नवऱ्यानं एक चापट मारली तर त्याला सासरवास किंवा छळ म्हटलं जात नाही, असा दावा हगवणेंचे वकिलांनी केला.
वकिलांचा दाव्यावर बोलन्यासाठी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेतली, आणि दाव्यांची पोलखोल केली. आत्महत्येपूर्वी वैष्णवीला ५ ते सहा दिवस मारहाण करण्यात आली होती, असा गंभीर आरोप कस्पटे यांनी केला आहे. हगवणे कुटुंबियांमुळे माझ्या मुलीचे लग्न दोन वेळा तुटले. त्यामुळे नाईलाजाने मला मुलीचे लग्न करावे लागले. आता तपासात अत्यंत मोठी माहिती पुढे आली. शशांक हगवणे हा वैष्णवीला ५ दिवस आणि नंतर ३ दिवस वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण करत होता.
अस त्यांनी सांगितल. वैष्णवी मोबाईलवर कोणाशी तरी चॅटिंग करत होती, ही चॅटिंग आम्हाला सापडली होती. त्यावरून तिचा मोबाईल तिच्या घरच्यांनी काढून घेतला होता, यावर बोलताना कस्पटे यांनी वकिलांना खडेबोल सुनावले. काल आरोपी वकील बोलले ते ऐकले आहे समाजाने ऐकले. ते चुकीचे बोलले असून, असे एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलले हे चुकीचे आहे. माझ्या मुलीचा बळी याला वेगळी कलाटणी द्यायची आहे. मोबाईल चॅटिंगबाबत आम्हाला कल्पना दिली नव्हती. कुठलाही माहिती दिली नव्हती. माझ्या मुलीवर चारित्र्याचा संशय घेतला. ते चुकीचं आहे, असं अनिल कस्पटे म्हणाले. वैष्णवीची चॅटिंग सापडली म्हणून आम्ही मोबाईल काढून घेतला असा दावा केला जातो आहे. तर मी तिला मोबाईल दिला कशाला, असंही कस्पटे म्हणाले.