LOKSANDESH NEWS
बुलढाण्यात कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन
गावरान आंबा नामशेष होताना दिसून येत असल्यामुळे गावरान आंब्याच्या व्हरायटी संकलन करून जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी सांगितले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या बुलढाण्याच्या कृषि विज्ञान केंद्र येथे जिल्ह्यातील शेतकरी तसेच आंबा प्रेमींसाठी आज एकदिवसीय “भव्य आंबा महोत्सव,आंबा प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात आंबा लागवडीला वाव मिळावा तसेच आंब्याच्या प्रजातींना ओळख मिळावी, या उद्देशाने हा आंबा महोत्सव आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये केशर, पायरी, लंगडा, निलंम, राजपुरी, मल्लिका, रत्ना, तोतापुरी, हापूस, दसेरी, आम्रपाली व गावरान यासह अन्य 20 प्रजातीचे 35 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला, प्रदर्शना मध्ये उपस्थित झालेल्या शेतकरी आणि नागरिकांनी या विविध प्रजातीच्या आंब्याची माहिती व चव घेतली यावेळी अनेकांनी तर त्यांच्या पसंतीचे आंबे देखील खरेदी केलेय. या आंबा महोत्सवाध्ये शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय. आंबा महोत्सवाचे उद्घाटन पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.