मेजर संदिप गायकर अनंतात विलीन;शासकिय ईतमामात अत्यसंस्कार
जम्मु-काश्मिर येथे अतिरेक्यांसोबत लढत असताना संदिप गायकर शहिद झाले. आज त्यांच्यावर अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे त्यांच्या मुळ गावी शासकिय मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
वीरमरण प्रात्त झालेले संदिप पांडुरंग गायकर यांच्या अंत्यवीधीला हजारोंचा जनसमुदाय जमला होता.संदिप गायकर अमर रहे अमर रहेच्या घोषणांनी संपुर्ण परिसर दणाणुन गेला होता. गायकर यांच्या आई सरूबाई गायकर व पत्नी दीपाली संदिप गायकर यांनी टाहो फोडला आहे. यावेळी उपस्थित सर्वांनाच अश्रु अणावर झाले होते. संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते.
गायकर यांना आपल्या कर्तव्य बजावत असताना त्यांनी प्राणांची आहुती देऊन देशसेवा केली. त्यांच्या पच्छात त्याचा दीड वर्षीय मुलगा रेयांश, पत्नी दिपाली, आई सरूबाई,वडील-पांडुरंग असे चौघांचे कुटुंब आहे.त्यांना दोन बहिनी देखील आहेत.त्यांच्या अत्यंवीधीनंतर संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव,अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.