LOKSANDESH NEWS
पुढील चार दिवस आणखी पाऊस हवामान खात्याचा अंदाज
मागील दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झालेला आहे. राज्यातील अनेक शहरांना या पावसाने चांगलंच झोडपून काढलय तसेच आणखी पुढील चार दिवस हा पाऊस अशाच राहणार असल्याची माहिती देखील हवामान खात्याने दिलीय. आणि
पुणे, सातारा,सांगली, कोल्हापूर, या हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आलाय. मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर मध्ये संपूर्ण भारताचा विचार केला तर सरासरीच्या 105% इतका पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलाय. आणि महाराष्ट्रात कोकण,गोवा,मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी दरवर्षी सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलीये.


