बुलढाण्याच्या खामगावात प्रशासनानाची मॉक ड्रिल
भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर खामगाव येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे शिवाजी नगर, शहर व ग्रामीण पोलिसांच्या वतीने मॉक ड्रिल घेण्यात आली. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाने काय काळजी घ्यावी यासाठी ही मॉक ड्रिल घेण्यात आली.
तणावजन्य परिस्थिती दाखवण्यात आली तसेच जखमी झालेल्या नागरिकांना रेस्क्यू टीमने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात कसे करावे,आग लागल्यानंतर आगीवर कसे नियंत्रण मिळवायला पाहिजे, त्यानंतर बुलढाणा येथील श्वान व बॉम्ब शोधक पथकाकडून घटनास्थळावर पाहणी करण्यात आली. व बॉम्बचा शोध लावण्यात आला अशाप्रकारे प्रशासनाच्या वतीने मॉकड्रिल घेण्यात आली. सदर मॉकड्रिल एनसीसी बटालियनचे लेफ्टनंट कर्नल जोशी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली