LOKSANDESH NEWS
सावळा गावाला दूषित पाणी पुरवठा; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
कडक उन्हाळ्यात असंख्य गावाला विंधीन विहिरी द्वारे किंवा टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे. सावळा गावात 20 वर्षांपासून पाणी टंचाई आहे. त्या गावांत कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना नाही.
अश्यातच येळगाव धरणातून पाईप्लाईन द्वारे सावला गावातील मुख्य विहिरीत पाणी आणलं जात आहे. ते पाणी सुद्धा दूषित असून तेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तापाचे आजार वाढले असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्वच्छ पाणी पुरवठा करावा. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली