मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले वैभवी देशमुखचे अभिनंदन
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिचे अभिनंदन केले. वैभवी देशमुखला बारावी परीक्षेत 85 टक्के गुण मिळाले असून, याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून तसेच दूरध्वनीद्वारे संवाद साधून वैभवीचे अभिनंदन केले.
पुढील शिक्षणासाठी तुला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही तुझ्या कायम पाठीशी असल्याचे देखील म्हटले. यावेळी वैभवीने वडिलांचे स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेल, तुम्ही सगळे सोबत आहात, त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मदत होईल, असे म्हणत माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर मुख्यमंत्र्यांनी न्याय नक्कीच मिळेल असे देखील म्हटले.