LOKSANDESH NEWS
एकनाथ खडसे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या मंत्र्याचे अभिनंदन
- जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या रावेर यावल तालुक्यात मेगा रिचार्ज प्रकल्पाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्यप्रदेश मुख्यमंत्री यांनी नुकताच सामंजस्य करार केल्या बद्दल एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सह त्यांच्या मंत्र्याचे अभिनंदन केले आहे.
- आपल्या काळात आपण हा प्रकल्प सुरू करण्याच्या साठी प्रस्ताव देत, त्याचा पाठपुरावा केला असल्याचं खडसे यांनी म्हटल आहे. एरवी फडणीस आणि गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करणाऱ्या खडसे यांनी फडणवीस आणि त्यांच्या सरकार मधील मंत्र्याचा अभिनंदन केल्याने, चर्चेचा विषय बनला आहे.
- शरद पवार अजित पवार एकत्र येत असल्याच्या चर्चा होत असल्या तरी या चर्चा मध्ये तथ्य नाही.
- नाशिक पालकमंत्री पदाच्या बाबत आजही तिढा कायम आहे,
काही मंत्री लाचारी करत आहेत, स्वाभिमानाने पालकमंत्री व्हायला पाहिजे, नाशिक जिल्ह्यात तीन तीन मंत्री आहेत, त्यांच्यावर जबाबदारी द्यायला पाहिजे, आणि कामाला वेग आणावा, असे सांगत खडसे यांनी नाव न घेता, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.
- भारत आणि पाक मध्ये करण्यात आलेली शस्त्र संधी चा मोदी यांचा निर्णय संदिग्ध आहे. भारताला POK ताब्यात मिळेल, त्याच बरोबर ज्या अतिरेक्यांनी निष्पाप लोकांना मारले, त्यांना मारले जाईल अशी अपेक्षा जनते मध्ये होती. दुर्दैवाने प्रत्येक अपेक्षा पूर्ण होतातच असे नाही.
- मला १०० कोटीच्या अब्रु नुकसानीची नोटीस गरीश महाजन यांच्या कडून दिली जाणार असल्याचं सांगितले जात होते, मात्र आज पर्यंत अशी नोटीस मिळाली नाही, जनरल नोटीस देण्यात आली आहे या व्यतिरिक्त नाही.
- राष्ट्रवादी शरद पवार गटातून काही नेते सोडून गेले असले तरी, कार्यकर्ते सोडून गेलेले नाहीत, त्यामुळे ज्यांना खूमखुमी होती ते सोडून गेल्याच पाहायला मिळत आहे. या सोडून गेलेल्या नेत्या मुळे आगामी निवडणुकी मध्ये काय परिणाम होईल, हे आताच सांगता येणार नाही.
- राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी वेळेवर फोन घेत नाही, सगळे व्हाइस मेल वर असल्याने, अडचणीच्या काळात कोणी कॉल करत असेल, तर त्यांच्या अडचणी कशा सुटणार, खडसे यांची सरकारी अधिकाऱ्यांवर टीका केली आहे.
- नाशिक मध्ये शेतकरी जमीन मंत्रिगिरीष महाजन यांनी हडपल्याच्या तक्रारी काही शेठ यांनी केल्या असल्याच्या बाबत आपल्याला काहीही माहिती नाही, याबाबत त्यांनाच तुम्ही माहिती विचारायला पाहिजे, आपण बोलू शकत नसल्याचं खडसे यांनी म्हटल आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.