आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये भाजपकडून मोर्चे बांधणीला सुरुवात
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये भाजपकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे. दरम्यान पनवेल महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी नगरसेवक व शेकडो पदाधिकाऱ्यांसह शेतकरी कामगार पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपची ताकद अधिक वाढली आहे. तर आता पनवेलमध्ये विरोधी पक्षाची ताकदच राहिली नसल्याने आगामी पालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रीतम म्हात्रे यांच्या नव्या भाजप कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या कार्यालयात जनतेचे प्रश्न सोडवणार असून आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आम्ही तयार असून भाजपची ताकद वाढली असल्याचं पनवले पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी म्हटलं.