सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका, सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी
काँग्रेसचे जेष्ठ नेते,अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी मागच्या अनेक वर्षांपासून म्हेत्रे काँग्रेस पक्षाशी होते एकनिष्ठ मात्र येत्या 31 में ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये म्हेत्रे आपल्या कार्यकर्त्यांसह करणार शिवसेनेत प्रवेश अक्कलकोटमध्ये पार पडणार
प्रवेश मेळावा आज सोलापुरातील रेवणसिद्धेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये बैठक घेत केलं शक्तीप्रदर्शन शिवसेना जिल्हा प्रमुख महेश साठे यांच्या उपस्थितीत पार पडला शिवसेना प्रवेशाचा निर्णय त्यामुळे म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली