चांगले रस्ते पुन्हा पुन्हा खोदू नका; मनपाच्या उधळपट्टी कारभारावर खासदारांनी ठेवले बोट
धुळे महापालिकेच्या माध्यमातून रस्ते तयार केले जातात. पण, पाईप लाईन टाकण्याच निमित्त करून चांगले रस्ते खोदून खराब केले जातात. मनपाकडून ही पैशांची उधळपट्टीच होत आहे. हे वेळीच थांबवा असे सांगत आता रस्ते तयार करताना नाशिक पॅटर्न राबविण्याचा सल्ला खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी आयुक्त अमिता दगडे पाटील यांना दिला.
मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या दालनात पावसाळ्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत डॉ. शोभा बाविस्कर, नगरसचिव मनोज मोरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. भुयारी गटार योजनेतंर्गत सुरु असलेल्या कामांमुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे. याशिवाय नव्याने रस्ते तयार केल्यानंतर या ना त्या कारणाने रस्ते खोदले जातात. परिणामी ही पैशांची उधळपट्टी म्हणावी लागेल. रस्ता तयार करताना आता नाशिक पॅटर्न राबवा. अर्थात रस्ता तयार करण्यापुर्वी पाण्यासाठी, इलेक्ट्रीक लाईनसाठी स्वतंत्र पाईप टाकून रस्ता तयार करावा असेही खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी यावेळी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली