केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये शंखनाद सभा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1 वाजता अमित शाह यांचे नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे. नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर अमित शाह यांची शंखनाद सभा पार पडणार आहे. या सभेची भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पावसाचा अंदाज पाहता या मैदानावर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेला आहे. 50 हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आली आहे.
दरम्यान या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, मंत्री मेघना बोर्डीकर, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह आमदाराची व खासदारांची उपस्थिती राहणार आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.