पिंपळगाव बसवंत येथे पावसाने द्राक्ष बागेत पाणीच पाणी
नाशिक जिल्ह्यात पावसाचा तडाका दिसून येत असून यावेळी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावली असून या आलेल्या पावसामुळे अक्षरशः द्राक्ष बागांमध्ये पाणीच पाणी झाल्याचे चित्र यावेळी पिंपळगाव बसवंत परिसरात दिसून आले .
तसेच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा येवला शहरासह तालुक्याला बसताना दिसत असून यावेळी आज देखील येवला तालुक्यातील नगरसुल गाव परिसरात तसेच अंदरसुलला देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यात सलग काही गावांना तिसऱ्या,तर काही गावांना चौथ्या दिवशीही दमदार पाऊस झाल्याचा दिसून येत आहे. आलेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याचे यावेळी दिसून आले