ज्यांनी शिवसेना काँग्रेसकडे गहाण ठेवली, काँग्रेसच्या दावणीला बांधली, तेच आज शिंदे साहेबांवर बोलतात आमदार राजेश मोरे यांचा टोला"
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे जोरदार समर्थन करत संजय राऊतवर सडकून टीका केली आहे. सकाळी नऊ वाजता भोंगा वाजल्याशिवाय राहात नाही अशी उपरोधिक टीका करत त्यांनी नाव न घेता ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी खोटे आरोप केले जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा वाजल्याशिवाय काहीजण राहात नाहीत. प्रसिद्धीची हाव लागली आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकांवर आरोप करण्यापलीकडे काही राहिलेलं नाही,"
"शिंदे साहेब बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चालले आहेत. खरी शिवसेना कुणाची हे सांगण्याचे काम जनतेने केलं आहे. सहा महिन्यांपूर्वी जनतेच्या कोर्टात गेलो आणि जनतेने आम्हाला न्याय दिला,"
"शिवसेना टिकवण्याचे काम शिंदे साहेबांनी केलं आहे. बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना कशी टिकवली पाहिजे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं आहे,"
"ज्यांनी शिवसेना काँग्रेसकडे गहाण ठेवली, काँग्रेसच्या दावणीला बांधली, तेच आज शिंदे साहेबांवर बोलतात. यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे. त्यामुळे अशांवर अनेक काना डोळा करावाच लागतो,"