LOKSANDESH NEWS
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा कहर, कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट
कर्ज घेऊन भातपिकाची लागवड केली. कापणीला आलेल्या भातपिकाची येत्या चार दिवसात कापणी करून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायचं, असं स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंग केलं. भंडारा जिल्ह्यात काल वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावली.
याचा सर्वाधिक फटका बसलाय तो पवनी तालुक्यातील पहेला परिसरातील शेती पिकाला. वादळी वाऱ्यानं कापणीला आलेलं शेकडो हेक्टरमधील भातपीक अक्षरश: भुईसपाट झालं. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली