LOKSANDESH NEWS
जळीत हत्याकांडाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश, मुख्याध्यापिका पत्नीच निघाली मारेकरी
येथे एका तरुणाचा निर्गुण खून करून मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह ज्वलनशील पदार्थ ओतून जाळुन टाकण्याची घटना लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगल शिवारात जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्र फिरवित मृताची ओळख पटवली आणि मृतक शिक्षकाची मुख्याध्यापिका पत्नीच मारेकरी निघाली आहे.
दरम्यान या प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारे विधी संघर्ष तीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे शंतनु अरविंद देशमुख असे पती शिक्षकाचे नाव आहे तर निधी शंतनु देशमुख असे मारेकरी मुख्याध्यापिका पत्नीचे नाव आहे.
शंतनु आणि त्याची पत्नी निधी हे दोघेजण यवतमाळ च्या सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापिका आहे या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा याचाच वचपा काठीत पत्नी निधीने पती शंतनूची हत्या केल्याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली