LOKSANDESH NEWS
नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी जप्त केला लाखो रुपयांचा स्पिरिट साठा
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात काल रात्री नाकाबंदी आणि ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरत बायपास रोड वरील हिरेमेडिकल समोरील उड्डाण पुलाजवळ एका माल ट्रक मधून स्पिरिटची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी लाखो रुपयांचा स्पिरिट साठा जप्त केला आहे.
धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली असता, सदर वाहनात 200 लिटर क्षमतेचे पाच रिकामे ड्रम आणि दहा ड्रम मध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असलेले तसेच बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट मिळून आले असून, सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत धुळे पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच याप्रकरणी चालक सुरेंद्र पंडित मराठे याच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.