सुसाट वाऱ्यामुळे घराचे छत उडाले; मात्र बाळ वाचले

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सुसाट वाऱ्यामुळे घराचे छत उडाले; मात्र बाळ वाचले

                                                           LOKSANDESH  NEWS 



                                         सुसाट वाऱ्यामुळे घराचे छत उडाले; मात्र बाळ वाचले 


- गेल्या दोन दिवसांपासून धुळे जिल्ह्यात आलेल्या वादळी पावसाने धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजुरांचे अतोनात नुकसान झालेले आहे. धुळे तालुका अजनाळे गावातील विजय संजय ठाकरे या शेतमजुराच्या घराचे संपूर्ण पत्रे उडून गेले आहे. तसेच घरातील अँगलला दोन महिन्याच्या बाळासाठी झोळी बांधली होती. आणि झोळीत बाळ होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या झोळीसह बाळ उडू लागले. मात्र वेळीच विजय ठाकरे आणि त्यांच्या पत्नीने ते बाळ झोळीतून काढून जीव वाचवण्यासाठी घराच्या बाहेर आली. 

आणि त्याचवेळी घराचे संपूर्ण पत्रे उडून गेले. त्यामुळे दोन महिन्याचे बाळ आणि विजय ठाकरे व त्यांच्या पत्नीचा जीव वाचला. विजय ठाकरे यांना प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे नुकतेच घरकुल मंजूर झाले होते. आणि त्याचा पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता देखील मिळालेला होता. 

तसेच मंजूर झालेल्या घरकुल योजनेचे इतर हप्ते येण्या अगोदरच विजय ठाकरे यांनी सावकारी कर्ज करून घरकुल बांधण्याच्या कामाला सुरुवात केली होती. प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे देण्यात येणारे हप्ते बाकी असतानाच अस्मानी संकटाने त्यांच्या घराची अक्षरशा वाताहात झालेली आहे. त्यांच्या घराचे जवळपास पंन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सदरच्या नुकसानीची शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केलेली आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.