LOKSANDESH NEWS
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर
शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, प्रलंबित पीक विमा देण्यात यावा, खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, आणि महायुतीतील नेत्यांनी निवडणूक दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, या मागणीसाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली