LOKSANDESH NEWS
सोलापुरातील शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू
- सोलापुरातील शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू
- उपोषण स्थळी देखील शिक्षकांकडून पेपर तपासण्याचे काम सुरूच
- शालार्थ आयडी तसेच शिक्षक मान्यता न मिळाल्याने सोलापुरातील शिक्षक आमरण उपोषणाला बसले
- एकीकडे आम्ही आमरण उपोषण करत असलो तरी दुसरीकडे आम्ही पेपर तपासण्याचे काम सुरूच ठेवले आहे.
- आम्ही बिनपगारी काम करत असलो तरी ज्ञानदानाचे काम सोडणार नसल्याचा शिक्षकांचा निर्धार
- मागील तीन वर्षांपासून आम्ही शिक्षक म्हणून बिनपगारी काम करतोय.
- मात्र शिक्षण विभागातील अधिकारी आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
- आमच्यातील अनेक शिक्षकांना अद्याप मान्यता मिळालेली नाही तर अनेकांना मान्यता मिळवून शालार्थ आयडी मिळाले नाहीत.
- त्यामुळे आम्ही मागील तीन ते पाच वर्षांपासून बिनपगारी काम करत आहोत.
- आमचे पाच सहकारी आमरण उपोषणाला बसले आहेत जर आम्हाला आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही सर्व शिक्षक आमरण उपोषणाला बसणार
- शिक्षण विभागातील अधिकारी एसीत बसून काम करतात मात्र आम्ही आमरण उपोषणाच्या मंडपात बसून पेपर तपासतोय
- शिक्षकांचे ज्या पद्धतीने हाल सुरू आहेत ते पाहून भविष्यात कोणीही शिक्षक व्हायला तयार होणार नाही
- आमची सरकारला विनंती आहे की शिक्षकांची होणारी अवहेलना थांबवावी आणि आम्हाला न्याय द्यावा.