सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थाचालक संघटना शिक्षक-शिक्षकेतर संघटनांनी आक्रमक

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थाचालक संघटना शिक्षक-शिक्षकेतर संघटनांनी आक्रमक

LOKSANDESH  NEWS 



                 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थाचालक संघटना शिक्षक-शिक्षकेतर संघटनांनी आक्रमक

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थाचालक संघटना शिक्षक-शिक्षकेतर संघटनांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या १५ मार्च २०२४ च्या जीआरविरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढला. त्या मोर्चाद्वारे सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संघटनांनी थेट रस्त्यावर उतरत शासन आणि अधिकारी यांच्या विरोधात हा जोरदार मोर्चा काढत एकजुटीचे दर्शन घडवून आणले.

 उद्यापासून उन्हाळी सुट्टी पडत असताना आजचा विद्यार्थ्यांना घेऊन काढलेला हा मोर्चा हा लक्षवेधी ठरला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ९१ शाळा या जीआरमुळे बंद पडणार असून तब्बल ८४३ शिक्षक हे जिल्ह्यातून अतिरिक्त होणार आहेत. तर ५० पेक्षा जास्त शाळा एक शिक्षकी होणार आहेत. या मोर्चेकऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी न स्वीकारल्याने मोर्चेकरांनी आक्रमक भूमिका घेत प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात ही लढाई लढू असा थेट इशारा शिक्षकांनी दिला आहे.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली