सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यात मक्याच्या खरेदीसाठी ११ केंद्र प्रस्तावित
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि मोरगाव अर्जुनी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मक्याचे उत्पादन घेतले जाते. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य दर व सोयीसाठी या दोन्ही तालुक्यांमध्ये एकूण ११ खरेदी केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
या केंद्रांमार्फत शेतकऱ्यांची नाव नोंदणी, व मक्याची खरेदी करण्यात येणार आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर ही केंद्रे कार्यरत होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नोंदणीसाठी आणि मक्याच्या खरेदी प्रक्रियेसाठी सज्ज रहावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे क्षेत्रातील मका उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली