चोपडा शहरातील जुने तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच काम नागरिकांनी थांबवलं
चोपडा शहरातील रस्त्यांसाठी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणला आहे, त्या नुसार शहरातील विविध भागात रस्ते विकासाचे काम सुरू आहे. परंतु नगर परिषदेचे इंजिनियर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर यांनी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर सुपर विजन न करता संबंधित ठेकेदार त्याचा सोयीनुसार काम करीत आहे. परंतु रस्ते झाल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना स्थानिक नागरिकांना करावा लागणार आहे.
स्थानिक नागरिक सदर उदबविणाऱ्या समस्या संदर्भात ठेकेदाराला सांगितले असता, ते हे काम आमचं नाही नगरपालिकेचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे असल्याचे उडवा उडवी चे उत्तर नागरिकांना देत आहे. नागरिकांच्या ऐकून देखील घेत नसल्याने, आज गांधी चौकातून जुने तहसील कार्यालयाकडे जाणारा रस्त्याचे काम दुकानदारांनी थांबवलं आहे. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील व प्रदीप बारी तात्काळ घटनास्थळी आले. व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सदर घटनेची माहिती आमदार साहेबांना देणार असे यावेळी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली