छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी दिल्लीकडे रवाना
भारताची राजधानी दिल्ली येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित साधून राष्ट्रीय जयंती महोत्सव समिती आणि संस्कृती कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज यांची 338 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत असून, हा सोहळा साजरा करण्यासाठी आज छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी दिल्लीकडे रवाना झाली आहे.
हा कार्यक्रम गेली तीन वर्षापासून दिल्ली येथे साजरा करण्यात येतो. यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज की जय घोषणाबाजी करत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार देखील मानले आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.