वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची केळी उध्वस्त तरीदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष
अर्धापूर तालुक्यातील निमगाव परिसरामध्ये गेली तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असून, त्यामुळे केळी बागेचे मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले आहे. प्रशासनाला शेतकऱ्यामार्फत माहिती दिल्यानंतर देखील तलाठी व मंडळ अधिकारी पंचनामे करण्यास टाळाटाळ करत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे विनंती केली आहे की, लवकरात लवकर आमच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे. व आम्हाला भरपाई देण्यात यावी. अशी मागणी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांनी केली आहे. या शेतीमध्ये जवळपास अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले असून, शेतकरी सध्या हाताला आलेले पीक हे वाया गेल्याने हतबल झाले आहेत, तरी शासनाने त्वरित आमच्या शेतीची पाहणी करून पंचनामे करावे, अशी आशा शेतकऱ्याकडून केली जात आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.