LOKSANDESH NEWS
दापोली व मंडणगड तालुक्यातील पहिल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन
दापोली व मंडणगड तालुक्यातील पहिलाच सौरऊर्जा आधारित पाणीपुरवठा प्रकल्प प्रकल्पाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कांगवई (पेडणेकरवाडी) येथील दीर्घकाळचा पाणीटंचाईचा प्रश्न अखेर सुटला असून सार्वजनिक नळपाणी योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. हा प्रकल्प दापोली व मंडणगड तालुक्यातील पहिलाच सौरऊर्जा आधारित पाणीपुरवठा प्रकल्प असून, इतर ग्रामीण भागासाठी एक पथदर्शी उदाहरण ठरतो आहे.
या प्रकल्पामुळे गेल्या २० ते ३० वर्षांपासूनचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सुटला आहे. खर्चिक व अस्थिर वीजपुरवठ्यावरची अवलंबनता कमी झाली असून, शाश्वत विकासाकडे एक ठोस पाऊल टाकले गेल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.