LOKSANDESH NEWS
नांदेड जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे कामे संथ गतीने; पेठवडज पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्ण करण्याची गावकऱ्यांची मागणी
केंद्र सरकारने सुरू केलेल्या जलजीवन मिशन चिंताक्रांत संथ गतीने सुरू आहेत. यामुळे नागरिकांना भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील पेठवडज गावाची पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नारायण गायकवाड यांनी केली आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात असलेली पाणीपुरवठा योजना मागील दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असताना उडवाउडवीची उत्तर मिळत असल्याचा आरोप नारायण गायकवाड यांनी केला आहे. शासनाने पेठवडज गावच्या पाणीपुरवठा योजनेकडे लक्ष घालून ही योजना तात्काळ सुरू करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली