वीज पडून शेतकऱ्याची बैलजोडी ठार
धुळे तालुक्यातील बिलाडी येथील अल्पभूधारक शेतकरी छोटू केशव माळी यांच्या शेतात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसात विजेचा मोठा प्रहार झाला. वीज पडून त्यांचे दोन्ही बैल जागीच मृत्युमुखी पडले आहे. छोटू माळी हे शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेती करत असून, ही बैलं जोडीच त्यांचे एकमेव शेतीकामाचे साधन होते. या घटनेमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर छोटू माळी यांनी तात्काळ तलाठी व मंडल अधिकारी यांना घटनेची माहिती दिली असून, अद्याप पंचनामा व मदतीसंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासना यांनी त्वरित पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी छोटू माळी यांनी यावेळी केली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली