LOKSANDESH NEWS
अकोला शहरात अज्ञात माथे फिरुने इंदिरा गांधीचा पुतळा पाडला
अकोला शहरात इंदिरा गांधीचा पुतळा पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातल्या अकोट फैल भागातील पूर पीडित कॉलनीतील इंदिरा गांधीचा पुतळा एका अज्ञात माथे फिरुने पाडल्याचा हा प्रकार समोर आला आहे, तर याची माहिती मिळताचं काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट होती. तर परंतु वेळीच रामदास पेठ आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रण आणली असून सध्या अकोट फैल भागात तणावपूर्ण शांतता आहे.
आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. तर इंदिरा गांधींच्या पुतळ्याला हानी पोहोचवणाऱ्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेवक रवी गिते यांनी केली असून या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी गुन्हे दाखल करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तर इंदिरा गांधीचा पुतळा दुरुस्त करण्याचे काम देखील सुरू करण्यात आलं असल्याच पोलिसांनी सांगितल आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली