भिवंडीतील नारायण कंपाउंड, वॉर्ड क्रमांक १६ मधील रस्त्यांची दयनीय अवस्था
शहरातील नारायण कंपाउंड, वॉर्ड क्रमांक १६ मधील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे असून, गटारांचे चेंबर पूर्णतः तुटलेले आहेत. यामुळे परिसरात साचलेले डायिंगचे दूषित पाणी बाहेर पडत असून, दुर्गंधीमुळे रहिवाशांचे जीवन त्रस्त झाले आहे. विशेषतः या भागात काम करणाऱ्या मजुरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वाहनचालक, विशेषतः टेम्पो चालक यांना गटाराच्या तुटलेल्या चेंबरमुळे त्यांच्या गाड्या अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्ती आणि गटाराची योग्य व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली