जर अनिल गोटे खोटे आरोप करत असतील तर सरकार तुमचं आहे मला अटक करा - अनिल गोटे
आमदार अर्जुन खोतकर यांनी अनिल गोटे यांची ही जुनी सवय असल्याचा आरोप केल्यानंतर त्यावर माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून आमदार अर्जुन खोतकर हे आपल्याला कधीपासून ओळखतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे दर सहा महिन्यांनी पक्ष बदलून बेडूक उड्या मारणाऱ्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न देखील गोटे यांनी उपस्थित केला आहे.
गुलमोहर शासकीय विश्राम गृह या ठिकाणी सापडलेले एक कोटी 84 लाख 84 हजार नेमके कोणाचे आहेत. तुमचा खासगी स्वीय सहाय्यक 15 मार्च पासून त्या ठिकाणी का आलेला होता असा देखील सवाल अनिल गोटे यांनी यावेळी उपस्थित केला.जर अनिल गोटे खोटा आरोप करत असतील तर सरकार तुमचं आहे मला अटक करा असा देखील इशारा गोटे यांनी यावेळी दिला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली