निवडून आलेले खासदार कुठे भूमिगत झाले आहेत? असा सवाल सिंधुदुर्गकर, रत्नागिरिकर विचारत आहेत - विनायक राऊत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

निवडून आलेले खासदार कुठे भूमिगत झाले आहेत? असा सवाल सिंधुदुर्गकर, रत्नागिरिकर विचारत आहेत - विनायक राऊत

LOKSANDESH   NEWS 




 निवडून आलेले खासदार कुठे भूमिगत झाले आहेत? असा सवाल सिंधुदुर्गकर, रत्नागिरिकर विचारत आहेत - विनायक राऊत


ON नितेश राणे 

- आम्ही एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करतोय ते त्यांच्या डोळ्यात खूपतय आणि निवडून आलेले खासदार कुठे भूमिगत झाले आहेत असा सवाल सिंधुदुर्गकर, रत्नागिरिकर विचारत आहेत

- मी जरी निवडून आलो नाही तरी सातत्याने माझा संपर्क या मतदारसंघात आहे

- नितेश राणे यांच्या कोणत्याही आरोपाला सिरियसली घेतलं नाहीये

- त्यांना जे मंत्रिपद मिळालं आहे, त्यांची गुरमी आणि मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये भिंनली आहे

- बिडवलकर प्रकरण असो किंवा सावडाव मारहाण प्रकरण असो या सगळ्या मागे एकनाथ शिंदे गटाचे म्होरके आहेत

- निलेश राणे यांचे समर्थक आहेत, हे सिद्ध झाले आहे

- त्यामुळे स्वतः गुंडांना पोसायचं, त्यांला खत पाणी घालायचं आणि इतरांच्या हत्या करायच्या हा जो राणेंचा प्रघात होता तो त्यांच्या दोन्ही मुलांनी चालू ठेवला आहे

- हे सिंधुदुर्गाचं दुर्दैव आहे

ON महाड पक्षप्रवेश

- महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत आहेत. तसं तसं या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला नामशेष करण्याचा प्रयत्न करत आहे

- शिंदे गट भाजपला नको आहे, ऍडजेस्टमेंट म्हणून अजित पवार गटाला ठेवतील

- भाजपा आणि अजित पवार गट शिंदे गटाचे विसर्जन करतील

ON सिंधुदुर्ग बीएसएनएल सेवा

- मी खासदार असताना शेकडोने बीएसएनएल टॉवर्स आम्ही मंजूर करून घेतले. मात्र, पुढे जाऊन त्याचा जो पाठपुरावा केला पाहिजे. त्यामुळे निवडून आलेले खासदार नारायण राणे होत नसल्यामुळे बीएसएनएल यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे 

ON मुंबई-गोवा महामार्ग डेड लाईन

- आयुष्यात 30 जून पर्यंत मुंबई-गोवा रस्ता पूर्ण होऊ शकत नाही. मला भीती वाटते परशुराम घाट या पावसाळ्यात पडेल. चिपळूण पाली लांजा ही ब्रिज पूर्ण व्हायला दीड वर्ष लागेल. संगमेश्वर पालीसह रायगड जिल्ह्यातील खूप मोठा भाग पूर्ण करून घेण्यासाठी किमान एक वर्ष जाईल

ON चिपी विमानतळ

- नारायण राणे यांना माहित आहे का चिपी विमान सेवा बंद झाली आहे ती. त्यांना सुद्धा प्रश्न विचारा कारण निद्रस्त असलेले खासदार दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेटल्यामुळे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने पाठपुरावा करणे गरजेचे होते मात्र या खासदारांनी त्याचा पाठपुरावा केलेला नाही. म्हणून ते बंद झालंय

ON लाचखोर अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केलं

- प्रशासन भ्रष्टाचारी झालेले आहे, संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासकांवरती ज्या धाडी टाकल्या जात आहेत, करोड रुपयांचा घबाड त्यांच्या घरामध्ये मिळत आहे

- त्यामुळे सध्याचे शासन आहे ते शासन आणि प्रशासन मिळून लूटमार करत आहेत

- भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचारी निर्माण करण्याचं काम सध्याचं सरकार करत आहेत

ON प्रशासन अधिकारी हप्तेगिरी

- अख्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त ड्रग्स सप्लाय होत आहे

- गोवा बनावट दारू सर्वात जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे. आणि हे सगळं सप्लाय करणारे सगळे भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांच्या गटाचे आहेत

- त्यामुळे या संपूर्ण अवैध धंदे करायचे असतील तर शेकडो रुपये प्रशासनाला द्यावेच लागणार आहेत

- त्यामुळे या सगळ्याचा आक्का बोका सर्व राणे कुटुंबीय आहेत



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली