LOKSANDESH NEWS
संतप्त माजी उपमहापौर कल्याणी अंपळकरांसह कार्यकर्त्यांचा वीज कंपनीवर हल्लाबोल; अधिकाऱ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न
भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष भागवत चितोळकर यांच्या घरासमोरील विद्युत तार धोकेदायक रित्या असून त्याठिकाणी नवीन कोटींग केबल तार टाकण्याची मागणी चितोळकर यांनी केली होती. त्यासाठी कार्यकारी अभियंता आर. बी. जोशी यांना लेखी अर्जही दिला होता. त्यानंतरही काम न झाल्याने चितोळकर यांनी माजी खा.डॉ. सुभाष भामरे, आ. अनुप अग्रवाल व भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपळकर यांच्याकडे हा प्रश्न मांडला. त्यानुसार तिघांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले होते. परंतु, पाच महिने झाले तरी वीज अधिकारी दाद देत नव्हते. या कामासाठी संबंधित अधिका-यांकडून पैशांची मागणी होत असल्याची बाब चितोळकर यांनी गजेंद्र अंपळकरांच्या निदर्शनास आणून दिली.
या पार्श्वभूमीवर राजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनारा आज साक्रीरोड वरील पाँवर हॉऊस येथे आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर कल्याणी अंगळकर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत वीज कार्यालय गाठले. दरम्यान, भाजपा कार्यकर्ते येत असल्याचे कळताच कार्यकारी अभियंता जोशी यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे आंदोलकांनी कार्यकारी अभियंता असलेले धनंजय भामरे यांच्या दालनात जाऊन कल्याणी अंपळकर यांनी धनंजय भामरेंना काळे फासण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्यांचा प्रयत्न यावेळी हाणून पाडला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./